<भडका उडला की आगीचा मोठा डोंब उसळतो आणि नंतर तो विझून जातो..वडवानलात सगळे जमीनदोस्त होते.. ओले सुके सगळे! पण समई चिकाटीने मंदपणे तरी तेवत असते, प्रकाश देत असते.>
मा. जीवन जि,
अगदी बरोबर सांगीतलेत. वडवानलात शत्रूला भस्मसात करण्याची आसक्ती असते आणि क्षमताही. मात्र त्यात तो स्वतः सुद्धा संपणार हे माहीत असते आणि त्याला ते गाभाऱ्याच्या भिंतींमध्ये सुरक्षितपणे तेवण्यपेक्षा प्रिय असते. क्षण एक पुरे शौर्याचा, वर्षाव घडो मरणांचा हे त्यांचे स्वप्न. स्वत: खाक होउन इतरांचा मार्ग मोकळा करणे हेच त्यांचे ध्येय. आपण दिव्य करायचे आणि हसत मरायचे, मरताना बलिदानाचा फायदा साऱ्यांना होउ दे असे दान मागायचे ही त्यांची रीत. समईचा प्रकाश फक्त तीच्या भोवती जमणऱ्यांनाच मिळतो, गाभाऱ्या बाहेरच्यांना नाही. समई तेवते ती दिसते मात्र जळणाऱ्या तेल-वातीचे कुणाला स्मरणही नसते! असो.
<इंग्रजांना घालवण्यात सशस्त्र क्रांती आणि अहिंसा हे दोन्ही मार्ग तेवढेच आवश्यक होते असे वाटते. > मग असे असताना गांधी आणि गांधीवादी सातत्याने क्रांतीकारकांचा निषेध वा विरोध का करतात? त्यांना त्यांचे श्रेय मिळायला यांचा विरोध का? जे मिळाले ते आमच्यामुळेच हा दुराग्रह का? कोणत्याही क्रांतीकारकाने कधीही गांधीना दूषणे दिली नव्हती, त्याचा धिक्कार केला नव्हता मात्र त्यांचा मार्ग आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देईल असे वाटते नसल्याने त्यांनी क्रांतिमार्ग चोखाळला होता.