कवितेच्या अर्थापेक्षा परिणामाला जास्त महत्त्व आहे, असं मला वाटतं... उदा. ग्रेसच्या, आरती प्रभूंच्या काही कविता. "गूढता मोहमयी आहे" असं (बहुधा) ग्रेस यांनी म्हटलं आहे. (अर्थात, 'गूढ' म्हणजे अगम्य नव्हे, तर सहज न उकलणारा अर्थ.)
मला या कवितेचा अंदाज आणि काही ओळींचा परिणाम आवडला. उदा.
शिणल्या देही थकलेले मन होते रांगत
व्यथा वेदना कुरकुर सारी होते सांगत
तोच कुठुनशी नाचत अल्लड झुळूक आली
गंध लाजरा मुठीत, हासू प्रसन्न गाली
गंध-मोगरा लावित गेला पंख मनाला
चंद्र अचानक स्वप्नप्रदेशी दिसू लागला