मुंबई स्पिरिटच. नक्कीच!
२६ जुलै २००५ मीही अनुभवलाय. वरळीला खूप वाट पाहिल्यावर सुदैवानं एक शेअर टॅक्सी मिळाली. माणसी २०० रू आणि ५ माणसं घेऊन टॅक्सीनं ३ तासांत बांद्रयाला पोचवलं. पुढे टॅक्सी जाणं, निव्वळ अशक्य होतं. मग छातीपर्यंत पाणी आणि पायी प्रवास सुरु झाला. पार्ल्याला पोचायला तब्बल साडेचार तास लागले. त्या पायी प्रवासात दर्शनी पडत होत्या तरंगणाऱ्या गाड्या आणि मुंग्यांप्रमाणं भासणारी आबालवृद्धांची दूरदूर रांग.
नंतर दुसऱ्या दिवशी पसरलेल्या त्सुनामीच्या अफ़वा...
वीज बंद, पाण्यानं अजुनही रस्ते भरलेले, अशा गंभीर परिस्थितीतही तिसऱ्या दिवशी स्टेशनवर पोचलेले, पण लोकल नाही म्हणून घरी परतणारे चाकरमानी चौथ्या दिवशी मात्र मिळेल त्या साधनाने ऑफ़िस गाठताना पाहिलं आणि खात्री झाली, हे निव्वळ मुंबई स्पिरिटच!
तुमच्या या लेखामुळं २६ जुलै २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या.
-खादाड बोका