काही दिवस सगळं सुरळीत होई पर्यंत शांत घरी बसले तर काय बिघडेल.

सुरळीत होणे म्हणजे आरामात ट्रेनमध्ये चढता येणे असा अर्थ घेतला तर निदान हा जन्मभर तरी घरी शांतच बसावे लागेल. जेंव्हा रोजचेच आयुष्य खडतर झालेले असते  आणि कोठल्याही कारणामुळे झालेला अधिक त्रास सहन केल्यावाचून गत्यंतर नसते, तेंव्हा  तो सहन करणे  तितकेसे असह्य वाटत नाही.

आज सकाळी हि पाऊस पडतच होता अश्या परिस्थितीत हि आज भरपूर लोक कामाला जाताना दिसले.

पाऊस किंवा दंगेधोपे, बाँबस्फोट यासारख्या कारणामुळे जेंव्हा वाहतूक विस्कळीत झालेली असते त्यानंतर कोणत्याही ऑफीसात किती टक्के उपस्थिती असते आणि आलेल्या लोकांमधील किती लोक प्रत्यक्ष काम करतात हेसुद्धा पहावे लागेल. अशा दिवसात नेहमीइतके काम होऊच शकत नाही असा माझा अनुभव आहे.