लोकल प्रवास करणाऱ्यांमधे  "हातावर पोट" असणारे सुद्धा असतीलच. अश्या लोकांना "कामाचे तास आणि पैसे " असे गणित प्रत्येक दिवसाला बसवावे लागते. शिवाय काही अपरिहार्य सेवा करणाऱ्यांना कामावर जाणे भाग असतेच. आणि मुंबईचा पाउस नेहमीचाच ट्रेन लेट करतो किंवा प्लॅटफ़ॉर्म वर पाणी साचवतो. हे आता लोकांना सवय व्हावी इतक्या नियमीतपणे प्रत्येक पावसाळ्यात होत आहे. तेंव्हा यथाशक्ति काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे याला उगाच "मानसिकता" वगैरे बिरुद लावणे फ़ारसे रुचले नाही.