माझे सुद्धा मराठी माध्यमातूनच झाले आहे. ११ वी - १२वी मध्ये असेपर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुला-मुलींचा तोरा असायचा. पण मराठी माध्यमामुळे मला कधीही काहीही अडचण आली नाही.
मराठी माणसाने आपल्या मुलांना मराठीचा वाराही लागू द्यायचा नाही आणि घरातही त्यांना इंग्रजी बोलायला वगैरे लावायचे हे खुळचटपणाचे आणि केविलवाणे आहे.
हे अगदी पटले मला. याचा अनुभव कार्यालयात नेहमीच येतो. मी मनोगत वर असते, मराठी गाणी ऐकते यावर मराठी लोकच हसतात. अक्षरशः कीव येते मला...