अनुभवकथन आवडले. एकदा आम्ही मैत्रिणी नागपुराहून मुंबईला चाललो होतो. आमच्या डब्यात एक अल्बम फिरत होता. आमची उत्सुकता चाळवली. काशाचा अल्बम आहे म्हणून बघायला मागितला आणि आमची अवस्था 'आ बैल मुझे मार' झाली. ज्या गृहस्थाचा अल्बम होता त्यांना मोठं-मोठ्या व्यक्तींबरोबर फोटो काढायचा शौक होता. त्या अनोळखी व्यक्तीने कोणा कोणा बरोबर किती साली किती कष्टाने कसे फोटो काढले हे वर्णन आम्हाला तब्बल दोन तास ऐकावे लागले.मुंबई आल्यामुळे आमची सुटका झाली.