मला आणि माझ्या बहिणीला ही मांजरं अतिशय प्रिय आहेत. माझ्या माहेरी कायम कुठून ना कुठून तरी मांजरं येतातच. आणि सर्वाना त्यांचा लळा पण आहे.
सध्या आई कडे २ पिल्ले आहेत. माहेरी गेल्या नंतर पिल्लांशी खेळण्याचा स्पेशल कार्यक्रम असतो.
दीड वर्षा पूर्वी आमच्या कडे एक मांजर होते. पिल्लू असल्या पासून आमच्याकडे होते ते. आम्ही त्याचे नाव "गुंडू" ठेवले होते. खूप दिवस लळा लावला त्याने. एक दिवस अचानक त्याचा कुठेतरी अपघात झाला आणि एका पायाने तो अधू झाला. आम्ही खूप उपचार केले. पण तो वाचू शकला नाही.