लेखमाला माहितीपूर्ण आहे. वाचताना एक शंका आली. ती विचारण्याआधी थोडी प्रस्तावना. साधारपणे अशा शंका विचारणे योग्य मानले जात नाही. म्हणून हे स्पष्ट करावेसे वाटते की यामागे कुठल्याही प्रकारे कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही. फक्त नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा हेतू आहे. शंका अशी
नेताजींनी मुसोलिनी आणि हिटलर यांची मदत घेतली तेव्हा त्यांना या नेत्यांची धोरणे, कृत्ये याबद्दल कल्पना होती का? हे दोन्ही नेते त्यांच्या देशातील हुकूमशहा होते. यांच्याशी सहकार्य करून जर आपला स्वातंत्र्यलढा सफल झाला असता तर त्या सहकार्याचे स्वतंत्र भारतावर काय परिणाम झाले असते?
हॅम्लेट