आधीप्रमाणेच रोचक माहिती. ज्युरासिक पार्कमध्ये याच पद्धतीने डायनॉसॉर डीएनए विकसित केला जातो. (अर्थात तज्ञांच्या मते या कथेमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत.)
नेटावर याबद्दल शोधले असता एक रोचक दुवा मिळाला. एका उंदराला अल्झायमर्स रोग व्हावा अशी रचना केली होती. नंतर माणसाच्या मेंदूतील पेशी उंदराच्या मेंदूमध्ये इंप्लांट (शब्द?) केल्यावर उंदराचा अल्झायमर्स बरा झालाच, शिवाय त्याची बुद्धिमत्ताही वाढली. आता हा उंदीर न्यूरो इंटर्फेसच्या सहाय्याने माणसांशी संपर्क साधू शकतो. दुवा इथे http://www.rythospital.com/clyven/lab.shtml
अशा बातम्या वाचल्यावर थोडी काळजी वाटू लागते. ज्युरासिक पार्कमध्ये डायनॉसॉर बघितल्यावर डॉ आयन माल्कम ज्युरासिक पार्कचा मालक जॉन हॅमंड यांना याविषयी जे इशारे देतो ते आठवतात. "जनुक तंत्रज्ञान ही आत्तापर्यंत विकसित झालेली सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे, पण तुम्ही एखादा मुलगा बाबांचे पिस्तुल मिळाल्यावर त्याच्याशी जसा खेळेल तसा तिचा वापर करत आहात."
हॅम्लेट