समस्या योग्य आहे पण सुचवलेला उपाय योग्य नाही. चांगला चित्रपट असेल तर प्रेक्षक सहसा त्याकडे पाठ फिरवत नाहीत. सिंहासन, सामना ह्या चित्रपटांना कलात्मक म्हणावे की व्यावसायिक? काही म्हटले तरी ते गाजलेच. सचिन, महेश कोठारी यांचे सुरुवातीचे चित्रपट निखळ विनोदी होते आणि ते यशस्वी झाले. पण नंतर बेर्डे-सराफ कंपनीची (केविलवाण्या) विनोदी चित्रपटांची लाट आली ती का चालली नाही?
मराठीत चांगले चित्रपट येण्याची गरज आहे, कलात्मक आणि व्यावसायिक दोन्ही. ज्यांना जसे चित्रपट हवेत तसे त्यांना बनवू द्या. चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या सबळ होईपर्यंत कलात्मक चित्रपट थांबवा या म्हणण्याला काही अर्थ नाही.
हॅम्लेट