बाकी इतर मुद्द्यांबद्दल मला काही म्हणायचे नाही पण
'हिंदी चित्रपट संगीतात जे प्रयोग होतात तसे प्रयोग आता मराठी चित्रपटात होत नाहीत;'
हिंदी चित्रपट संगीतात जे प्रयोग होतात, तसे प्रयोग मराठी चित्रपट संगीतात पूर्वी कधी झाले? हिंदी चित्रपट संगीत सुमारे १९४५ सालापासून अनेक दिशांनी फुलले, बहरले. अनेक देशी, प्रादेशिक व तसेच इजिप्त्शियन, अरेबिक संगीतापासून ते पार पाश्चिमात्य संगीत-- शास्त्रीय व इतर प्रकार- त्या संगीताने आपलेसे केले. त्या तुलनेने निदान १९९० पर्यंतचे मराठी चित्रपट संगीत अगदीच मोनोटोनस, खुजे राहिले असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. १९९० नंतरच्या मराठी चित्रपट संगीताबद्दल मला फारसे माहित नाही.