तुम्हाला केवळ बिंडोकच चित्रपट आवडतात म्हणून कोणी अर्थपूर्ण चित्रपट काढूच नयेत?
आणि अर्थकारणाचं गणित काय केलंत नक्की तुम्ही?  फायनान्सर्स, वितरक, निर्माते यांच्यापैकी एकाशी तरी बोलला आहात का?

आम्ही काढला होता अर्थपूर्ण चित्रपट आणि गावागावात फिरलो होतो तो घेऊन. जिथे गेलो तिथे तो लोकांनी डोक्यावर घेतला. आर्थिक यश मिळालं. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आमच्या सिनेमाला ओळख मिळाली. मुळातलं बजेट जेमतेम असूनही चित्रपटाचं टेक्श्चर, हाताळणी याचं मासेस ते क्लासेस सगळीकडे कौतुकही झालं. चांगलं काम केलं असेल तर ते कुठल्याही कोष्टकात न मोडता सगळीकडे पोचतं.. तुम्हाला पेलत नाही मराठीमधे चांगले सिनेमे आलेले त्यावर कोण काय करणार?

चित्रपटाचं बजेट मोठं म्हणजे दर्जा असं नाही. हायफाय तंत्रज्ञान वापरणं म्हणजेच दर्जा असे नाही. आणि मराठी चित्रपट बेर्डे-सराफ जोडगोळीच्या बिंडोकपणापासून दर्जाकडे वळू पाहतायत, नवीन विषय हाताळू पाहातायत तर तुम्हाला का त्रास होतो?

आणि आहेत ना तुमच्यासाठी बिंडोक चित्रपट काढणारे. ते बघा आणि गप्प बसा ना. सगळ्यांनीच बिंडोकासारखं काम केलं पाहिजे हा आग्रह का? आणि हे सांगायचा तुमचा अधिकार तरी कुठला? कारण जे दावे तुम्ही करता आहात ते किती फोल आहेत हे मला व्यवस्थित माहितीये. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रपटाचे मार्केटींग व वितरण या सगळ्या गोष्टीचा मला अनुभव आहे. तेव्हा तुम्ही म्हणता आहात ते प्रातिनिधिक नक्कीच नाही हे मला माहितीये.