खिळवून ठेवणारे वर्णन!

मी असाच एकदा पावसात झालेल्या रेल्वे घोटाळ्यात विक्रोळी ते पुणे असे तिकीट काढून पस्तावलो होतो. नेहमी ठाण्याला येऊन पुण्याची गाडी पकडता येत असे. मात्र त्या दिवशी ती गडबड झाली आणि वेळापत्रक कोसळले. पुण्याचे तिकीट काढलेलेच होते म्हणून ठाण्याहून कर्जत लोकलने कर्जतला. पुढे कुठल्यातरी एस टीने खोपोलीला. तिथून खोपोली नगरपालिकेच्या बसने लोणावळ्याला आणि तिथून लोकलने पुण्याला गेलो होतो, त्याची आठवण झाली.