समीर,

बरेच मुद्दे पटले.. मीही लहान असताना अनेक मराठी चित्रपट (बनवाबनवी वगैरे) खूप आवडीनं बघितले होते...

सचिनचेही अनेक चित्रपट (उदा. एकापेक्षा एक) हे पाशात्त्य चित्रपटांवरून घेतलेले आहेत. पण वसंत सबनीसांसारख्या लेखकानं त्याचं सुंदर रूपांतर केलं होतं.

शेवटी चित्रपट हा एक व्यवसाय आहे. कला, प्रबोधन आणि व्यवसाय यांची देखील उत्तम सांगड घालता येते हे राजाभाऊ परांजपे, भालजी पेंढारकर, राजदत्त, दत्ता केशव, कमलाकर तोरणे, दिनकर द. पाटील, अनंत माने, व्ही. शांताराम, प्रभात सिनेमा यांनी यशस्वीपणे दाखवून दिले आहे. उगीच अभिजात कलाकृती, दर्जेदार कलाकृती, आशयगर्भ कलाकृती असल्या फुसक्या गोष्टींचा जास्त बाऊ करण्यात काही अर्थ नाही.

अगदी बरोबर! दर्जेदार कलाकृती सगळ्याच भाषांमधे निर्माण होतात; पण तद्दन व्यावसायिक चित्रपटही. 'ब्लॅक' हा चित्रपट मला जरी आवडला, तरी दुसऱ्या वेळेला बघायला मी जाणार नाही; मी 'लगान', 'दिल चाहता है' हे १ पेक्षा जास्त वेळा बघू शकतो (बघितले आहेत).

चांगले उमदे, तगडे नायक, सुंदर नायिका निवडा

हा मुद्दाही विचार करण्यासारखा आहे. चांगले (दिसणारे) नायक-नायिका बघायला हिंदी चित्रपट का बघायला लागावेत? (उदा. 'अनाहत' हा मला सोनाली बेंद्रे बघायला म्हणूनही आवडला).

इतकं स्पष्ट लिहिताना बऱ्यांच वेळा वाचकांना ते एककल्ली वाटू शकतं; पण शेवटी - कुणी कुणाला टिकवत नसतं फार काळ.. ज्याचं त्यानंच तगायचं असतं; हे तुम्ही फार छान मांडलंय.

- कुमार