अलीकडे 'अगंबाई अरेच्च्या' सारख्या चित्रपट-संगीतात नवीन प्रयोग नक्कीच झाले आहेत आणि ते लोकांना आवडलेही आहेत.
चित्रपटाव्यतिरिक्त आणि ९० सालानंतर म्हणायचं झालं तर यशवंत देवांनी संगीत दिलेली पाडगावकरांची 'बोलगाणी' ('कॉफ़ी हाऊस'), भीमराव पांचाळेंच्या गझला, इ. ... ह्यामुळे मराठी संगीत खुजं आहे / त्यात प्रयोग होत नाहीत, असं मला वाटत नाही.
बऱ्यांचदा 'नवीन ते वाईट' असा नव्या-जुन्यांचा समज दिसतो. म्हणूनच कदाचित 'सारेगमप' सारख्या कार्यक्रमांत जुनं गायलं जातं. (चित्रपटांव्यतिरिक्त झालेल्या प्रयोगांचा मी मुद्दाम उल्लेख केलाय कारण गैरफिल्मी गाणी मराठी 'सारेगमप'मधे गायली जातात).
शिवाय, नवीन चांगल्या रचना होत असल्या तरी प्रत्येक चांगली गोष्ट सर्व लोकांपर्यंत पोचतेच असं नाही; त्यात भांडवलाच्या / व्यवसायाच्या अनेक मर्यादा येतात.
- कुमार