कुमार,
दातारांनी लिहिले ''हिंदी चित्रपट संगीतात जे प्रयोग होतात तसे प्रयोग आता मराठी चित्रपटात होत नाहीत;'
त्यांतील 'आता'ला मी मुद्दाम माझ्या प्रतिसादात लाल दर्शविला, तो हे अधोरेखित करण्यासाठी की 'आता प्रयोग होत नाहीत' ह्या विधानात 'पूर्वी असे (म्हणजे हिंदी चित्रपटसंगीतात होत तसे) प्रयोग होत होते' असे अभिप्रेत आहे. माझा सर्व प्रतिसाद त्या 'पूर्वी'च्या संदर्भाला आहे. म्हणूनच मी विचारले:''हिंदी चित्रपट संगीतात जे प्रयोग होतात, तसे प्रयोग मराठी चित्रपट संगीतात पूर्वी कधी झाले? "
मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे ९० नंतर काय झाले हे मला माहिती माही, कारण त्यासुमारास माझा मराठी गीतांशी संपर्क सुटला. आपल्या प्रतिसादातही आपण ९० नंतरच्या काळाबद्दलच बोलत आहात: 'चित्रपटाव्यतिरिक्त आणि ९० सालानंतर म्हणायचं झालं तर ....'
९० अगोदरच्या काळातील मराठी चित्रपटसंगीत, वैविध्यात हिंदी चित्रपटसंगीताच्या आसपासही कुठे पोहोचत नाही, ह्यावर दुमत नसावे.