तुम्हाला केवळ बिंडोकच चित्रपट आवडतात म्हणून कोणी अर्थपूर्ण चित्रपट काढूच नयेत?

अहो मनोरंजन करणारे सिनेमा म्हणजे बिनडोक सिनेमा हा शोध कधी लागला तुम्हाला?

फायनान्सर्स, वितरक, निर्माते यांच्यापैकी एकाशी तरी बोलला आहात का?

बोलायला कशाला पाहीजे? भारतमाता सिनेमागृहात जाउन पहा. त्या तुमच्या कलात्मक का काय म्हणतात त्या सिनेमाला चार पाच टाळकी सुद्धा बसलेली नसतात! कायद्याचं बोला मात्र हाउसफूल होता!.  यातच सगळं काही आलं.

आम्ही काढला होता अर्थपूर्ण चित्रपट आणि गावागावात फिरलो होतो तो घेऊन. जिथे गेलो तिथे तो लोकांनी डोक्यावर घेतला. आर्थिक यश मिळालं. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आमच्या सिनेमाला ओळख मिळाली

कुठला सिनेमा ते कळूदे तरी आम्हाला!

तुम्हाला पेलत नाही मराठीमधे चांगले सिनेमे आलेले त्यावर कोण काय करणार?

अहो चांगले सिनेमा म्हणजे आशयघन (किंवा आशयघाण?) कलात्मत सिनेमा हे कुणी ठरवलं? तुम्हीच का?

आणि आहेत ना तुमच्यासाठी बिंडोक चित्रपट काढणारे. ते बघा आणि गप्प बसा ना.

बरं बरं तुम्ही तुमचे ते आशयघाण, कलात्मक चित्रपट काढा आणि कौतुक मिळवा. प्रत्येक वेळी कौतूक मिळालं कि आम्हाला कळवा. आम्ही आमच्या तिकिटाचे पैसे त्या बिनडोक सिनेमांसाठी खर्च करतो आणि कौतूक तुमच्या आशयघाण सिनेमाला देतो. तुमच्या पुढील कलात्मक सिनेमांना असेच भरपूर कौतूक मिळो हि सदिच्छा !!