असा चित्रपट बनवला तर मराठी माणूस जवळपासच्या थेटरात तो लागत नसल्यामुळे बघणार नाही आणि दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे त्याला यश मिळणार नाही असे वाटते...

उदा. सध्या पुण्यात मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रभात किंवा कोथरुडमधील सिटीप्राईड वगळता दुसरा पर्याय उपलब्ध नाही. सरकारी नियमानुसार आवश्यक असल्यामुळे इतर थेटरे सुतकी वातावरणात कधीतरी मराठी चित्रपट लावतात. कायद्याचं बोला हा पिंपरी चिंचवड परिसरात बहुधा लागलाच नव्हता. झी मराठीवर लागल्यावरच मला तो बघता आला.

मराठी चित्रपट थेटरात बघणारच अशी भीष्मप्रतिज्ञा करुन कधीही न थांबणाऱ्या पीएमटीच्या मिनतवाऱ्या करुन त्यात बसणे आणि गुटख्याचा वास मारणाऱ्या प्रभातमध्ये हा चित्रपट पाहणे यासाठी मोठी तपश्चर्या व कमावलेले शरीर, नाक (कान व डोळे) आवश्यक आहेत.