मी चांगल्या व्यावसायिक चित्रपटांचीच भलावण करतो आहे. 'श्वास' किंवा 'डोंबिवली फास्ट' हे चांगले चित्रपट होते. त्यात प्रेक्षकांच्या भावनांना हात घालणारे कथानक आणि तशी हाताळणी होती म्हणून त्यांना घवघवीत यश मिळाले. आशयगर्भ चित्रपट निर्माण करणारे देखील चांगला सिनेमा बनवितात; नाही असे नाही; फक्त मला एवढे म्हणायचे आहे की त्यात व्यावसायिक मुल्ये योग्य रीतीने घालायला पाहिजे तर ते चित्रपट सामान्य लोकांपर्यंत पोहोचतील. केवळ पुरस्कारांसाठी चित्रपट बनवणे यात काही शहाणपण नाही. आणि असलेच कुणाही पर्यंत न पोहोचणारे चित्रपट सातत्याने बनविल्यास मराठी चित्रपटसृष्टीचे भवितव्य काय? एखादा कलावंत देखील आधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचून मग एस्टॅब्लिश झाल्यावर प्रयोगांकडे वळतो. 'सिंहासन', 'सामना' यात एक जबरदस्त व्यावसायिक भान पाळले होते आणि ते म्हणजे त्यात प्रस्थापित आणि हुकुमी कलाकार होते; त्यांचा संघर्ष अगदी उत्कंठावर्धक रीतीने चित्रित केला होता म्हणून प्रेक्षक धावले. आजकालच्या तथाकथित 'आशयगर्भ' चित्रपटांच्या बाबतीत तसे घडते आहे काय? दुर्दैवाने याचे उत्तर 'नाही' असेच आहे.

--समीर