आपला चित्रपट चालू नये या इच्छेने कोणी काढत असेल असे वाटत नाही.तसे असेल आणि  तो  चालला नाही तर त्याचा अंदाज खरा ठरल्याबद्दल निर्मात्याचे कौतुकच करावे लागेल. तो चालावा अशी इच्छा असेल तर त्यासाठी काय करायला हवे हे समीरजीना कळते पण त्या धंद्यात असणाऱ्याला कळत नाही तेही अनेक चित्रपट साफ आपटताना दिसत असताना हेही अनाकलनीय आहे ! या परिस्थितीला मराठी प्रेक्षकाची मानसिकताही कारणीभूत आहे. दक्षिणेकडे प्रेक्षकाना चित्रपटाचे जबर वेडच आहे त्यामुळे चित्रपटतारकांची मंदिरे बांधली जातात. दक्षिणेतील तीन राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एके काळी चित्रपट कलावंत विराजमान झाले होते. मराठी प्रेक्षक चित्रपट बघायला जाताना लगेच २५०+१५०+ ६५ असे गणित करून चित्रपटाला जायचा विचार तहकूब करतो पण घरात "चार दिवस सासूचे" ला शिव्या घालत बघत बसतो.उच्चभ्रू मराठी प्रेक्षकाना आपण मराठी चित्रपट बघतो हे सांगायची लाज वाटते आणि त्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकत असल्याने त्यांना मराठी चित्रपट कळतच नाही. अमेरिकेतसुद्धा दक्षिण भारतीय भाषातील चित्रपट काही ठिकाणी चालू असलेले पाहिले पण मराठी मात्र कुठे दिसला नाही.