अहो असं कसं? जमल्यास आशय फिल्म क्लबची मेंबरशिप घ्यायची.  'नितळ-फितळ' बोलायचं , एखाद्या आशयगर्भ इराणी चित्रपटाचं नाव घ्यायचं,  आयज़नस्टाइनबद्दल चर्चा करायची... ऑन द वॉटरफ्रंट टू गुड हं.... रॉबर्ट डी नीरोचा रेजिंग बुल मधला परफ़ॉरमन्स चांगला की टॅक्सी ड्रायवर मधला, ह्यावर वाद घालायचा.  गुळण्या करत किंवा गुळण्या न करता फ्रेंच दिग्दर्शकांची, नट्यांची नावं घ्यायची. फेलिनी, कुरोसावा आणि रे तर अनिवार्यच. मग वेळ उरलाच तर 'नितळ-फितळ' आणि इतर आशयगर्भ हिंदीमराठी चित्रपटांची नावं घ्यायची. म्हणजे कसं आयुष्याचे सार्थक झाल्यासारखं आमच्या काही जिवलग मित्रांना वाटतं.
                आता आपल्याला दादा कोंडके आवडतात म्हणून कशाला त्यांचा आनंद हिरावून घ्यायचा  ?