बरेच मुद्दे पटले. पण हिंदी इंग्रजी वरुन ढापलेले कोठारे मिर्नीत पाच अक्षरी चित्रपटच फक्त पुढे यावे आणि बाकी सर्व बनू नये याच्याशी असहमत.
प्रचार व मार्केटिंग मध्ये (पैशामुळे) मराठी चित्रपट कमी पडतात. आधी प्रेक्षक नाहीत म्हणून पैसा नाही, प्रचारासाठी पैसा नाही म्हणून प्रेक्षक नाहीत असे दुष्टचक्र आहे.
मराठीत वेगळे प्रयोग व्हावेत असे वाटते. आशावादी वा निराशावादी कसाही संदेश देणारी असो, कथा प्रभावी असावी, चित्रीकरण चांगले असावे, काही हिंदी चित्रपट गाणे व हृतिक मुळे चालतात तसे गाण्यामुळे चित्रपट चालेल अशी गाणी चित्रीत व्हावी. या निकषांमध्ये बसणारा सामाजिक आशयाचा चित्रपटही लोकप्रिय व्हायला हरकत नसावी.
पण चित्रपटात काही तरी घडत रहावे. अर्धा तास एका अंधाऱ्या खोलीवर क्यामेरा असे 'कलात्मक' या नावाखाली असू नये. कलात्मक म्हणजे वास्तविकतेला धरुन असलेला चित्रपट. त्यात डोळ्याला त्रास देणारे अंधारे चित्रीकरण, सावकाश विचार करुन ५ मिनीटांनी एक वाक्य बोलणारी पात्रे नसावीत.
मला रात्र आरंभ, सातच्या आत घरात, लपंडाव, एक उनाड दिवस, श्वास, तू तिथे मी आवडले.
लक्ष्या अशोक जोडगोळीचा (बहुधा सुबल सरकारांनी बसवलेला) नाच आणि अत्यंत पांचट विनोद हे मिश्रण गावांत पण फार काळ लोकप्रिय राहू शकणार नाही, प्रेक्षकांना भक्कम कथा हवी.
(कृपया या सर्व वाक्यांना 'मला असे वाटते' हा प्रत्यय लावून वाचावे. चित्रपटसृष्टीचा आणि बॉक्स ऑफीसचा माझा अभ्यास वगैरे नाही.ही माझी मते आहेत.)