ग्राहक-दुकानदार मानसिकता पटली.

आणि दाक्षिणात्य चित्रपटातील लोकांपेक्षा आपण अभिजात कलाकृती, अमक्यातील भावनिक गुंतागुंत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न, भावभावनांचा आलेख, हळुवार हाताळणी वगैरे गोष्टींचा जरा जास्तच विचार करतो आणि तोंडघशी पडतो.

हे पटले नाही. गोपालकृष्णन, कासारवल्ली आणि अगदी मणीरत्नमच्या चित्रपटात सुद्धा ९९ टक्के मराठी चित्रपटांपेक्षा जास्त विचार केला आहे. (मला वाटते.) मात्र आपण तोंडघशी पडतो याच्याशी सहमत.
अमोल पालेकरांचे कैरी आणि बनगरवाडी बघून रडायला आले होते. काय वाट लावली दोन्ही कथांची.  त्यापेक्षा आधीचे त्यांचे तथाकथित मनोरंजक चित्रपट चांगले होते.