दोन घटका मस्त गाणी, संगीत, विलोभनीय दृष्ये, डोळ्याचे पारणे फेडणारी मारामारीची दृष्ये, सुंदर नायिका, दिलखेचक नृत्ये, दमदार नायक आणि त्यांचे दमदार संवाद...
मणीरत्नमचा "तिरुडा तिरुडा" मी पाहिलेला पहिला तमिळ चित्रपट. अहाहा, काय बहारदार चित्रपट होता म्हणून सांगू! चक्रावून टाकणारी अत्यंत मनोरंजक कथा, प्रशांत सारखा टवटवीत नट, हीरा राजगोपालसारखी सुंदर नटी,मणीचं अप्रतिम दिद्गर्शन, रामगोपाल वर्माची पटकथा, (संवाद तमिळ असल्याने कळाले नाहीत - नाहीतर ते एक) , ए.आर. रेहमानची गाणी (कुन्जम निलवू 'चंद्रलेखाSS' डॉल्बीवर -खल्लास!), पुथुम पुढुभुमी वेंदुम गाण्याचं डोळे भरून पहावं असं हिरवंगार चित्रीकऱण - काय काय सांगू?
आणि ते कोवाईचं थिएटरही इतकं भन्नाट होतं. डॉल्बी साऊंड सिस्टिम, ७० मि. मि. नवीकोरी प्रिंट, थंडगार - न पचकलेलं - शिटा न फाडलेलं - जागोजागी बिलोरी झुंबरं टांगलेलं, वॉल-टू-वॉल कारपेट घातलेलं, धूप फिरवलेलं थिएटर, त्र्याण्णव साली तो एक स्वर्गच होता.
- समसमा संयोग.
पैकं फिटलं कशाला? अवो, कर्ज झालं म्हणा की! हां, हे चित्रपट असल्या थिएटरमध्ये बघण्याच्या लायकीचे आहेत खरे.
असले चित्रपट मराठीत होऊ लागले तर... होतील का कधी?
बाकी वर उल्लेख झालेले सर्व 'चांगले' मराठी चित्रपट घरातल्या डिव्हीडी/सीडीवर बघितले तरी चालते की.;)