शशांक,

अगदी काळजाला हात घालणारा विषय आहे   स्वर्गात ताक नसते असे म्हणतात. जेव्हा मी जाईन (मी स्वर्गात जाईन असे इथे गृहीत आहे. इच्छा करायचीच तर मागेपुढे कशाला बघायचे?  ) तेव्हा सर्वात आधी चहा आहे की नाही हे विचारेन. मला चहा कुठल्याही वेळी चालतो. खूबसूरतमध्ये रेखा म्हणते, "चाय पिने का भी कोई वक्त होता है?" माझ्या मते हे मूलभूत सत्य (Fundamental truth) आहे.

पुणे विद्यापिठात असताना रोज गेलाबाजार साताठ कप चहा होत असे. कुणाला चहासाठी विचारायचे तर तुला चाहत आहे कारे अशी विचारणा होत असे. आणि लांब असला तर दोन हातांनी T ची खूण करायची. दोन्ही बाबतीत होकार जवळजवळ गृहीतच असायचा.

शेन नुंगची आख्यायिका मीही ऐकली आहे. देव त्या राजाचे कल्याण करो.

हॅम्लेट