मग एकदा मला वर उल्लेखलेल्या मराठी चित्रपटांपैकी एका तथाकथित यशस्वी आणि रहस्यमय चित्रपटाचे चित्रीकरण पहाण्याचा योग आला. हे चित्रिकरण रामोजी राव फिल्मसिटीत सुरू होते.

"इथे सिनेमाला लागणारं सग्गळं आहे पण फार महाग आहे बुवा." "एका बेबीला तासाला अमुक भाडं पडतं." "हॉटेल फार महाग आहे." "युनिटला चहापण विकत घ्यावा लागतो."- असा एकंदर सूर होता. असो. 
अशा पाच पन्नास बेब्या वेगवेगळ्या कोनात लावून रामोजीतल्या लोकेशनवर उभारलेल्या भव्य सेटवर शंभर नर्तक नृत्य करत आहेत आणि शूटिंग सुरू आहे. येणारे - जाणारे पर्यटक कुतुहलाने कोणता?? असे विचारतात आणि उत्तर मिळेल - आई तुझं लेकरू - पुढेमागे कधीतरी असं होईलही कदाचित.

तोपर्यंत खऱ्या ताजमहालाऐवजी पडद्यावर रंगवलेला ताजच आपल्याला मराठी चित्रपटात पहावा लागणार. त्यात काय? शेवटी तिथे ताज महाल आहे एवढे सूचित झाले म्हणजे पुरे. कथानकात तेवढीच अपेक्षा आहे.