अनुष्का,
(कृपया मला 'तुम्ही' असे संबोधू नये. 'तू'च चालेल, नव्हे पळेल :))
ब्लॉग लिंकसाठी धन्यवाद. वाचन चालू आहे.
हो, पुढे पाळलेल्या भाटीवर आणि तिच्या दोन पिलांवर लेख लवकरच टाकेन.
नाही इथे (अमेरिकेत) मांजर नाहीये आमच्याकडे. इथे पाळणं शक्यही होणार नाही. अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये काहीजणांच्या मांजरी दिसतात त्या दृष्टीसुखावर समाधान मानते.
(अवांतर: इथे एकाने तर चक्क भलाथोरला ससाही पाळला आहे!)
आता ती हौस भारतात परतू तेव्हाच भागवेन.
बाकी, 'सभ्य बोका' असं वाचून हसू आवरत नाहीये. दिपंकर नाव छान आहे :)