>>अहो मनोरंजन करणारे सिनेमा म्हणजे बिनडोक सिनेमा हा शोध कधी लागला तुम्हाला?<<
बिंडोक सिनेमांची माझी व्याख्या मी स्पष्ट केली आहे आता तुमचं मनोरंजन त्यानेच होतं हा काही माझा दोष नाही. प्रत्येकाच्या मनोरंजनाच्या कल्पना वेगळ्या असतात. केवळ नाचगाणी आणि हाणामाऱ्या असलेल्या सिनेमाला बिंडोक नाहीतर अजून काय म्हणणार?

>>बोलायला कशाला पाहीजे? भारतमाता सिनेमागृहात जाउन पहा. त्या तुमच्या कलात्मक का काय म्हणतात त्या सिनेमाला चार पाच टाळकी सुद्धा बसलेली नसतात! कायद्याचं बोला मात्र हाउसफूल होता!.  यातच सगळं काही आलं.<<
काही माहित करून घ्यायचं नाही. कसलाही अभ्यास नाही केवळ उचलली जीभ लावली टाळ्याला... आधी वितरक, निर्माते इत्यांदींशी बोला आणि मग ही सगळी विधानं करा. विचारा त्यांना की वरती सांगितलेल्या फॉर्म्युल्यावर बनवलेल्या किती फिल्म्स उत्तम व्यवसाय करतात. केवळ भारतमाता म्हणजे जग नाही. आणि हो अजून एक याच भारतमाता मधे आमच्या सिनेमाच्या तिकिटासाठी लागलेल्या रांगांचे मटामधे कितीतरी दिवस फोटो आले होते.

>>कुठला सिनेमा ते कळूदे तरी आम्हाला!<<
हे कशासाठी? तुमच्या प्रश्नाचा रोखच चुकीचा आहे. काय करणारात नाव कळल्यावर? मी दिलेली माहिती खरी की खोटी तपासणार? की आधीच्याच उचलली जीभ पद्धतीने आमच्या सिनेमाचे नाव घेऊन ओरडत सुटणार? मी जे लिहिलंय ते खरं आहे हे मला माहितीये आणि इथल्या काही जणांनाही माहितीये. तुमच्याकडून पावती घेण्याची मला गरज नाही.

>>अहो चांगले सिनेमा म्हणजे आशयघन (किंवा आशयघाण?) कलात्मत सिनेमा हे कुणी ठरवलं? तुम्हीच का?<<
नुसते कुठून तरी काहीतरी उडतउडत ऐकलेले शब्द वाकडेतिकडे करून वापरले म्हणजे तुमच्या म्हणण्याला अर्थ प्राप्त होत नाही. कलात्मक चा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? आणि आशयघन या शब्दाचा सुद्धा? या वर्गवारीनेच चित्रपटसृष्टीचे आणि प्रेक्षकांचे सर्वात जास्त नुकसान केलेय हे माहितीये का तुम्हाला?

>>तुमच्या पुढील कलात्मक सिनेमांना असेच भरपूर कौतूक मिळो हि सदिच्छा !!<<
कुत्सित असल्या तरी शुभेच्छांबद्दल आभार. आमच्या पहिल्या सिनेमालाही भरपूर यश (व्यावसायिक व कौतुक) दोन्ही पातळीवर मिळाले आहे. तेव्हा तुमच्या फक्त कौतुक मिळो, पैसा मिळणार नाही या वक्तव्यात तसाही काही अर्थ नाही. आणि पुढे काय होणार हे कोणी सांगितलंय. पुढच्या फिल्मच्या रिकव्हरीनंतरच बोलू आपण.