आभार, आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल.
रा. वा. गुणे हे माझे वडील. सन १९७२ ते अगदी २००३ पर्यंतच्या काळात त्यांनी रचलेल्या कवितांचं हस्तलिखित वाचताना त्या ओळीओळीतली ताकद आम्हा भावंडांना जाणवत होती. माझ्या वडिलांनी या कविता प्रसिद्ध करण्यासाठी कधीच आटापिटा केला नाही. आम्हाला मात्र तसं वाटायचं. पण `करू कधीतरी' अशा विचारात ते पुढेपुढे जात राहिलं, आणि, अखेर राहूनच गेलं...
दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आम्ही भावंडांनी खाजगी वितरणासाठी `भाव चिंतन'चे प्रकाशन केलं. पण, काहीतरी राहून गेल्याची खंत कायम राहिली.
त्यासाठी हा छोटासा प्रयत्न.
आपल्यासारख्या जाणकारांची दाद मिळाली, तर ती खंत, रुखरूख कमी होईल...
या कविता त्यांच्याच नावाने वाचकांसमोर सादर व्हाव्यात, असंच वाटतं.