आर्टिओ म्हणा की. कसा खणखणीत, कलदार शब्द आहे. बंद्या रुपयासारखा. असो. अजून कुठलाच परवाना काढलेला नाही. पण आर्टिओवाले फारच दयाळू, कृपाळू, कनवाळू आहेत. घरबसल्या परवाना देतात. वेळ पडल्यास 'बॅकडेटेड' परवाने देतात. कुणालाही परवाने देऊ शकतात. इथे 'श्रद्धा' आणि 'भक्ती' असल्यास 'सबुरी' करावी लागत नाही.