भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास किंवा संबंधित लेख लिहिताना मोहनदास करमचंद गांधी यांचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे. पण सदर नेत्याचे सर्वच निर्णय योग्य होते आणि देशहितकारी होते असे म्हणण्याचा अट्टहास काही लोकांचा दिसतो. मो.क. गांधींच्या कृतींचा ताळेबंद न मांडणे म्हणजे म्हणजे(च) "प्रगल्भ भाष्यकार" होणे असे कोणाचे मत असेल(च) तर असो बापडे.
===
नागरी/मानवीहक्क चळवळ आणि स्वातंत्र्यलढा या गोष्टी एकाच मापात तोलता येतील(च) असे वाटत नाही. इंग्रजांशी सशस्त्र लढा देणारे भगतसिंह जेंव्हा तुरुंगात होते तेंव्हा मानवी हक्कांसाठी त्यांनी सत्याग्रहाचे(च) अस्त्र वापरले होते.
===
स्वातंत्र्याच्या यज्ञात आपल्या अनेक सुपुत्र आणि सुपुत्रींची आहुती देणाऱ्या बंगालमध्ये जन्मलेल्या नेताजींना, याच देशाच्या मातीत जन्मलेल्या आणखी एका सुपुत्रास "राष्ट्रपिता" अशी पदवी का द्यावीशी वाटली कोणास ठाऊक? अमेरिकेला अनेक "राष्ट्रपिते"(फोऽरफादर्स) आहेत, त्याचा परिणाम असावा की काय?