अनेक कारणांमुळे सगळेच वाचक तुम्ही म्हणताहात त्या बातम्या वाचत नाहीत. ह्या बातम्या अनेकदा मी पहिल्यांदा मनोगतावरच वाचलेल्या आहेत. शिवाय इथे त्यावर चर्चा होऊ शकते. एकंदर लोकांची मते कळतात.
१००% सहमत.
खेरीज अनेकदा मला टंकांची अडचण येते, विशेषतः कोणी 'लोकसत्ता' मधील लिखाणाचा दुवा दिला असेल तर. अशा वेळी ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा नेमका लेख सहजी वाचायला मिळाला तर सोयीचे वाटते. लेखासंबंधी आपली मते लिहितानाही लेख 'वर'च दिसत असेल तर बरे असे वाटते.