स्वातंत्र्ययुद्धाचा ताळेबंद वाचताना अथवा लिहिताना साचेबद्ध विचार करू नये अशी अपेक्षा आहे. आजही अनेक प्रश्न अपूर्ण आहेत. त्यासाठी गांधी अथवा नेताजी सारख्या लोकांनी वापरलेल्या मार्गाचा अवलंब करता येईल का या दिशेने विचार करावा अशी रास्त अपेक्षा आहे.

ठोबळ इतिहास लिहिणारे बरेच असतील पण आज थोडेसे तटस्थ होऊन लिहिता आले तर त्याचा बराच चांगला आणि विधायक परिणाम होईल असे मला वाटते. आजच्या काळात आपल्याला एका चांगल्या द्रष्ट्याची, भाष्यकाराची आणि विचारवंताची गरज आहे. सुदैवाने मनोगत वर अश्याप्रकारच्या लेखकामध्ये ती क्षमता आहे, म्हणून ही सूचना केलेली होती.

राष्ट्रपिता या उपाधीबद्दल, नेताजींना गांधीबद्दल आदर होता हेच यातून सिद्ध होत नाही काय?