>>अहो, मी सांगीतलेल्या फॅक्टसच आहेत आणि इथे तुम्ही वगळता प्रत्येक जण फॅक्टसच सांगत आहे. <<
तुम्हाला तुमच्या मताच्या पुष्ट्यर्थ येणारं प्रत्येक उत्तर फॅक्ट वाटतंय. आणि मी माझ्या अनुभवतून सांगतेय तर तुम्ही माझा अनुभव खोटा आणि तोकडा अशीच ओरड करताय.

>>मराठी सिनेमा ला कोल्हापूरमध्ये काळं कुत्रं ही विचारेनासं झालं आहे ही फॅक्टच आहे ना? मराठी सिनेमा नेहमीच केविलवाणा असतो ही फॅक्टच आहे ना?<<
या सगळ्याचं खापर तुम्ही नाचगाणी किंवा हाणामाऱ्या एवढ्याच बिंडोक पातळीवर राहू न शकणाऱ्या सिनेमावर, दिग्दर्शकांवर फोडताय आणि ती फॅक्ट म्हणून ओरडताय.

>>मी आयुष्याची २० वर्षे खेड्यात काढली आहेत. माझा जन्म, शिक्षण सगळं खेड्यातलं आहे त्यामुळे तिथल्या लोकांची मानसिकता जेवढी मला कळते तेवढी पुण्या-मुंबईतल्या 'आशयगर्भ' चित्रपटाची निर्मिती करणाऱ्यांना कळत नाही ही फॅक्ट आहे.<<
थोडक्यात काय तुम्हालाच काय ते समजतं आणि ज्यांनी खरोखर अनुभव घेतलाय, भरपूर माहिती, वेगवेगळ्या स्तरातले इनपुटस जमवून मग काही निरीक्षणे मांडलीयेत, अभ्यास केलाय आणि त्यावर आधारीत काम करून एक मॉड्युल यशस्वी करून दाखवलंय त्यांना अक्कल नाही कारण ते पुण्या-मुंबईकडचे आणि बिंडोक कामाला नकार देणारे.

>>थिएटरची ऑक्युपन्सी व्यवस्थित नसेल तर एक्झिबिटरची वाट लागतेच की नाही? त्याला तोटा होतोच की नाही?<<
माझी अक्कल काढायला गेलात आणि घसरलात!! एक्झिबिटरची वाट लागत नाही त्याला जे कराराप्रमाणे जे मिळायचे ते मिळतेच. वरचा एक्स्ट्रॉ नफा मिळत नाही.  

>>अहो, याला मार्केटचा अभ्यास देखील कशासाठी करायला पहिजे? हे सर्वश्रुत आहे. म्हणूनच तद्दन व्यावसायिक चित्रपट एवढ्या मोठ्या संख्येने बनतात आणि यशस्वी होतात ना?उगीच सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ गोष्टींसाठी मार्केटचा अभ्यास, आकडेवारी, स्टॅटीस्टिक्स, रीसर्च वगैरे भंपकपणाने काही साध्य होत नाही. <<
कधी आयुष्यात केलात अभ्यास तर समजेल कशासाठी करायला पाहिजे. सर्वश्रुत.. तेच ऐकीव गोष्टी केवळ. आणि माझंच खरं मी म्हणतो तेच सूर्यप्रकाशाइतकं सत्य म्हणून ओरडायचं. पहिल्यापासून तुमचं म्हणणं की कुठल्याही वितरक, निर्मात्याशी या विषयावर चर्चा करायची तुम्हाला गरज पडत नाही, कसला अभ्यास करायची गरज नाही कारण तुमच्या खेड्यातला माणूस जे म्हणतो तेच एकमेव खरं. बाकी सगळे झूट. जगात कुठल्याही विषयात ऐकीव किंवा वरवर समोर दिसणाऱ्या गोष्टी आणि रिसर्च, सर्व्हे मधून मिळणारी आकडेवारी यामधे दुसऱ्या गोष्टी विश्वासार्ह धरल्या जातात आणि तुम्ही त्यालाच भंपकपणा म्हणता.

>>तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये असून देखील तुम्हाला हे माहित नाही की एक परिपूर्ण मनोरंजनात्मक सिनेमा काढणं हे किती अवघड काम आहे तर मग तुमचं चित्रपटांचं ज्ञान खूप तोकडं आहे असंच खेदाने म्हणावं लागेल.<<
माझ्या ज्ञानाबद्दल तुम्ही चिंता करू नका. माझं मी बघून घेईन ते. एकिकडे परिपूर्ण मनोरंजनात्मक म्हणायचं आणि दुसरीकडे त्याची टकाटक स्टार्स, नाचगाणे आणि हाणामाऱ्या इतकी मर्यादीत आणि बिंडोक व्याख्या करायची यातून तुमच्या ज्ञानाची पातळीही लक्षात येतेच आहे.

>>जरा एकदा अशा चित्रपटाची पटकथा लिहून बघा म्हणजे मग कळेल की अस्सल करमणूकप्रधान चित्रपट लिहिणे ही काय चीज असते. तुमचे 'आशयगर्भ' चित्रपट लिहायला काही फारसं डोकं लागत नाही.<<
ह्या विधानाला आकस, अहंकार आणि अज्ञानापोटी आलेले मूर्ख विधान याच्यापलिकडे काहीही म्हणता येणार नाही.

>>इथे बाकीची सगळी मंडळी हे कबूल करत आहे पण तुमची मतं ही तुमच्या अपुऱ्या ज्ञानावर आधारीत आहेत;<<
तुम्हाला सतत माझी अक्कल ज्ञान काढण्यात काय इंटरेस्ट आहे हे मला समजत नाही. पण तुम्ही कसलाही अभ्यास करायची गरज नाही, केवळ ऐकीव माहितीवर आधारीत विधानं करताय आणि परत स्वतःच्या ज्ञानाचा टेंभा मिरवण्यासाठी मला कमी लेखताय तेव्हा तुमची एकुणातच पातळी माझ्या लक्षात येते.

>>तुमचा कुठला आहे सिनेमा ज्याने गावोगाव फिरवून एवढं 'घवघवीत' यश मिळवलं? नाव तरी सांगा. ती काय तंबाखूची पुडी आहे सेल्समनने गावोगाव फिरून विकायला? अशी पब्लिसिटी मी तरी कुठल्याच चित्रपटाची ऐकली नाही. <<
परत तेच. तुम्ही ऐकलं नाही म्हणजे ते चुकीचं का? जे घडलंय ते खोटं? कारण काय तर तुम्ही ऐकलं नाहीत. तुम्ही काय सर्वज्ञ आहात असा दावा आहे का तुमचा? आणि मला सिनेमाचं नाव विचारताय ते कशासाठी? मी माझ्या सिनेमाचं नाव सांगितल्यावर मग खरं खोटं करण्यासाठी? कारण प्रश्नाचा रोख तर योग्य वाटत नाही.

>>'काय द्याचं बोला' ला असली नस्ती उठाठेव करावी लागली का? नाही. तुमच्या प्रॉडक्टमध्ये तेवढा दम नव्हता म्हणून तुम्हाला वणवण करावी लागली.<<
एकतर ज्याला तुम्ही तुमच्या मर्यादीत अवकाशात नस्ती उठाठेव म्हणताय त्याला नवीन मार्केटींग स्ट्रॅटेजी म्हणून नाझ मधल्या अनेक वितरकांनी वाखाणलंय. आमच्या प्रॉडक्टमधे दम असेल नसेल पण असा काही चित्रपट आहे हे जोवर लोकांना माहितच नसतं तोवर ते बघायला जाणार कसे? मी कुठल्या चित्रपटाबद्दल बोलतेय हेही तुम्हाला माहित नाही आणि तरी प्रॉडक्टमधे दम नाही अशी विधानं करताय.

>>'काय द्याचं बोला' किंवा 'जाऊ तिथं खाऊ' किंवा 'बघ हात दाखवून' ची अशी इनोवेटिव प्रसिद्धी केली होती का? नाही. गरजच नाही. खणखणीत नाण्याला इतकी टोकाची प्रसिद्धी करायची गरजच पडत नाही.<<
तुमच्या या खणखणीत नाण्यांच्या व्यावसायिक यशाचे चार्टस मला दाखवा. मला माहितीये आमचा प्रॉफिट आणि लोकमान्यता यांच्यापेक्षा जास्त आहे ते. हेही माहितीये की तुम्ही हे कधीही मान्य करणार नाही कारण तुम्हाला तुमच्या म्हणण्यापेक्षा वेगळं काही ऐकून घेण्यातच इंटरेस्ट नाही. आणि कुठल्याही अभ्यासातून आलेल्या आकडेवारीवर तुमचा विश्वास नाही.

>>हे तुम्ही जे सगळं सांगीतलतं ते वर्तमानपत्रात वगैरे सांगायच्या गोष्टी झाल्या. माझे प्रश्न: तुम्ही कोणत्या गावांत गेला होतात? असा हा 'अर्थपूर्ण' सिनेमा कुठला? माझ्या गावात येता का असा खेळ आयोजित करायला?<<
परत तेच तुम्ही म्हणाल तेवढंच खरं आणि दुसरा सांगतोय त्याला किंमत नाही. आपल्या विरूद्ध मत म्हणजे भंपकपणा, वर्तमानपत्रात सांगायच्या गोष्टी... आणि मग तुम्ही माझ्याकडे आकडेवारी आणि पुरावे मागणार. तुम्हाला तर एकही आकडेवारी सिद्ध करता आलेली नाही. तुमच्या आकडेवारीमधे तर केवळ ऐकीव माहिती आहे. ती खरी कशावरून हे मी पण विचारू शकते ना तुम्हाला. तुम्ही खेड्यातून आलात म्हणजे तुम्हाला सर्व मराठी जनतेची अभिरूची समजलेली आहे ह्या दाव्यालाही पुरावा द्या ना तुम्ही.

>>मी अभ्यासापेक्षा अनुभवांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. अनुभवातून जे शिकता येतं ते अभ्यासातून शिकता येत नाही.<<
होका? मी साधारण ५ वेळा तरी सांगितलं की मी माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून बोलतेय. पण तुम्ही माझा अनुभव खोटा, मी सांगतेय ते खोटं, माझी अक्कल कमी, ज्ञान अपुरं एवढंच बोलताय. अनुभवाबरोबरच डोळे उघडे ठेवून अभ्यास करण गरजेचं आहे अन्यथा नुसत्या अनुभवाने दिशाभूल होण्याची शक्यता जास्त.  

>>तुमच्या अगदी पहिल्या प्रतिसादाकडे एकदा नीट बघा. वैयक्तिक पातळीवर आधी तुम्ही उतरलात हे लक्षात ठेवा.<<
तुमच्या पहिल्या लेखातली भाषा जी आहे ना ती कुणाही चांगलं काम करणाऱ्या माणसाला चीड आणेल अशीच आहे. केवळ नाचगाणी, हाणामाऱ्या प्रकारातले सिनेमे काढावेत आशय असलेले सिनेमे करू नयेत असली फॅसिस्ट वृत्ती आहे. मी केवळ हे सांगायचा तुमचा अधिकार विचारला. बाकी कुठलेही वैयक्तिक पातळीवरचे विधान केले नाही. तुम्हाला जे सिनेमे आवडतात त्यांना मी बिंडोक म्हणाले हे फारच छोटं आहे. तुम्ही आशय असलेल्या सिनेमांना जी नावे ठेवली आहेत त्यापुढे हे काहीही नाहीये.

>>मी माझ्या लेखात जे खरे आहे, जे आम जनतेला वाटते तेच लिहिले आहे. तुम्ही नाकारलतं म्हणून सत्य बदलत नाही. आणि चर्चेचे काही संकेत असतात, नियम असतात.<<
खरं असण्याबद्दलच्या दाव्यामागे निरीक्षणे व अभ्यास असावा लागतो. आम जनतेला म्हणता तेव्हाही ठोस आकडेवारी असावी लागते. ते न देता तुम्ही माझंच खरं असा घोषा करताय. आणि संकेत, नियम इत्यादींबद्दल बोलताना स्वतः पहिल्या लेखात काय लायकीची भाषा वापरली आहेत ह्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताय.

>>मग जर तुमचा पहिला प्रतिसाद जर अतिशय उद्धट भाषेत असेल आणि तो ही वैयक्तिक पातळीवर उतरणारा, संतापजनक आणि चीड आणणारा असेल तर चर्चेचा अर्थ नीट कुणाला कळला नाहीये हे इथेच स्पष्ट होते.<<
माझा पहिला प्रतिसाद तुमच्या संतापजनक आणि बेसलेस विधानं असणाऱ्या तुमच्या लेखावर होता. तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरला नाहीत पण आशय असलेले चित्रपट बनवणाऱ्यांना यथेच्छ नाव ठेवून घेतलीत आणि वर सगळ्यांनी केवळ तुम्हाला योग्य वाटतं तसेच सिनेमे काढायला हवेत असंही म्हणालात. हे सांगण्याचा तुमचा अधिकार कुठला हे विचारलं तर तुम्ही माझ्यावर वैयक्तिक आगपाखड सुरू केलीत.

या चर्चेतच काही अर्थ नाहीये कारण तुम्हाला केवळ काही प्रकारच्या चित्रपटांना धोपटायचं आहे. बाकी काही नाही.

जाता जाता काही फॅक्टस...
१. महाराष्ट्रातल्या आतल्या ठिकाणी जिथे मराठी चित्रपट एक दिवसही टीकणार नाही अस वितरकांचा अंदाज होता त्या ठिकाणी आमचा चित्रपट एक आठवड्याहून जास्त काळ टिकलाय. ७०-८०% बुकींग ने.

२. आमच्या चित्रपटानंतर अनेक ठिकाणची कलेक्शनची गणितं बदलली.

३. जत्रेत तंबूत दाखवण्यासाठी १६ मिमि च्या राईटसची 'घसघशीत' ऑफर आज ३ वर्षांनंतरही आमच्यासाठी स्टॅण्डिंग आहे.

४. आमच्या चित्रपटानंतर मराठी सिनेमाही बघायला हवा असं वातावरण तयार व्हायला सुरूवात झाली ज्याचा फायदा आमच्या नंतर आलेल्या अनेक चित्रपटांना (काय द्याचं बोला सकट) थोडा का होईना झाला.

५. थोडक्यात उत्तम निर्मिती(कलामूल्ये, सच्चेपणा आणि कुठलीही व्यावसायिक तडजोड नसणे) आणि मार्केटींगचे एक मॉड्युल आम्ही यशस्वी करून दाखवले. हे नक्कीच माहितीये की १००% जनतेपर्यंत पोचू शकलो नाही पण एका प्रयत्नात कधीच ते घडत नसते. जेवढे आम्ही पोचू शकलो त्याच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत आपण ज्या चित्रपटांची भलावण करत आहात तेही पोचू शकले नाहीत.

६. आज हिंदीमधे यशराज सारख्या बॅनरला स्टारकास्ट, मार्केटमधलं वजन, भरपूर मसाला असं सगळं असलं तरी मिळणारी रिकव्हरी जेमतेम आहे त्यांच्या बजेटच्या रेश्यो मधे. त्याउलट उत्तम मांडणी असलेल्या वेगळ्या फिल्म्स त्यांच्या त्यांच्या बजेटच्या प्रमाणात उत्तम व्यवसाय करतायत. (यासाठी ऐकीव माहिती नाही तर खरोखरीची आकडेवारी बघावी लागेल तुम्हाला कितीही भंपकपणा वाटला तरी.)

७. थोडक्यात फॉर्म्युला फिल्म्सच केवळ चालण्याचे दिवस संपत आले आहेत आणि ज्याला उत्तम निर्मिती (कलामूल्ये, सच्चेपणा, मांडणी, व्यावसायिक तडजोडी नसणे) अश्या सिनेमांना प्राधान्य मिळू घातले आहे (असा सिनेमा म्हणजे केवळ गंभीर, अंधारी वातावरणातली बडबड नव्हे).  

८. जे खेड्यापाड्यातले लोक जबरदस्त, थरथराट आणि इतर पाच अक्षरी मूर्ख सिनेमांना गर्दी करतात त्यांना काही वेगळे नकोच आहे असे समजणे हे चुकीचे आहे. त्यांना पर्याय नसतो म्हणून ते स्वीकारले जाते.

९. एवढ्या सगळ्यानंतर मला आमच्या चित्रपटाचे नाव सांगायची गरज वाटत नाही. ते तुम्हाला अजूनही कळत नसेल तर तुमची एकुणातच समज तोकडी आहे किंवा तुम्हाला चर्चेत रस नाहीये तर विरोध करणाऱ्या मताला झोडपून काढायचंय असं समजणे इष्ट ठरेल.

या वरच्या फॅक्टससाठी माझ्याकडे आकडेवारी आणि पुरावे आहेत. नुसती ऐकीव माहिती नाही.

याउप्पर या विषयावर इथे कुठलंही मी स्पष्टीकरण, पुरावे मी द्यावेत असे मला वाटत नाही. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही घेऊन बसा. आम्ही आमचे काम करतोच आहोत आणि काळाच्या ओघात कळेलच. अनुभव, निरीक्षण आणि अभ्यासातून काम करणारे खरे ठरतात की ऐकीव ज्ञानावर फॅसिस्ट प्रवृत्ती जोपासणारे ते.