पराकोटीची निराशा अथवा एखादे काम करतांना / एखाद्या परिणामाची अपेक्षा करतांना झालेला अपेक्षाभंग
अशा अर्थाने हा वाक्-प्रचार वापरला जातो.
उदा. संजय दत्तला शिक्षेत सूट मिळावी म्हणून त्याच्या वकिलांनी फार प्रयत्न केले,
पण तसे झाले नाही. त्याला शिक्षाच झाली.
सगळंच मुसळ केरात!
सांगोवांगीने ऐकलेला अर्थ :
एकदा एकाने मुसळ तासून बासरी करण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झाले नाही.
मात्र तासून तासून मुसळाचा कचरा झाला आणि केरात गेला.
सगळंच मुसळ केरात!