उखळीचा वापर सहसा काहीतरी बारीक करण्यासाठी करतात. आत्ता पहा, त्याचा वापर करुन काहीतरी बारीक करायचे म्हणजे किती श्रम लागतात.. पण केलेले श्रम उपयोगात आले असं केंव्हा वाटतं...? जर जी गोष्ट आपण बारीक करण्यासाठी इतके कष्ट घेतले ती व्यवस्थित झाली तरच ना?
अन्यथा काय..? जी चांगली गोष्ट होती ती पण नाही आणि केलेले श्रमही व्यर्थ.....!!!! एकंदरीत काय.. इतका वेळ जी मुसळ बडवत होतात ... ती केरातच ना??
म्हणुन सहसा ही म्हण ज्यावेळी केलेले श्रम वाया जातात आणि हातात काहीच उरत नाही त्यावेळी करतात.
आता... कायच समजले नाही असे म्हणु नका नाहीतर ही म्हण म्हणन्याची माझ्यावर वेळ यायची!!!!