रोमच्या भ्रमणामध्ये आलेल्या अनुभवाचे सुंदर वर्णन वाचून ती हकीकत डोळ्यासमोर उभी राहते. रोमबद्दल इतर कांही लोकांचे अनुभव ऐकलेले असल्यामुळे फारसे आश्चर्य मात्र वाटले नाही. आम्ही रोमला गेलो असतांना हवेत एवढी ऊष्णता नव्हती, तरी खिडकी उघडी ठेवावी असे वाटायचे, पण चोरांच्या भीतीने ती बंद करून झोपावे लागले.
आपली गाठ एका भुरट्या चोराशी पडली हे ही नशीबच. त्याने फक्त पैसे ठेऊन घेतले आणि इतर वस्तू तिथेच टाकल्या. विशेषतः पारपत्र परत मिळाल्यामुळे पुढचा मोठा त्रास वाचला. परदेशी पारपत्रांना तिथल्या काळ्या बाजारात मोठी किंमत मिळते असेही आम्ही ऐकले होते, त्यामुळे प्रवासात सगळीकडे तो अक्षरशः गळ्यात बांधून हिंडत होतो.
मला आलेले 'रोम'हर्षक अनुभव माझ्या अनुदिनीवर वाचायला मिळतील.