लेख छानच आहे. अनुभव खरेच रोमांच उभे करणारा.. परदेश प्रवास करणाऱ्या सर्वांनाच पारपत्राची चोरी हे एक भयस्वप्नच असते. आपल्याला ते (म्हणजे पारपत्र हो !) परत मिळाले हे बरे झाले. नाहितर बहुधा पाचएकशे युरोचा बुर्दंड आणि मनस्ताप. आता तुम्ही सुद्धा सांगूशकाल की आमचे पारपत्र काही तासांकरिता चोरीला गेले होते म्हणून . इटली हा भुरट्या चोरांचा देश आहे हे ऐकून होतोच. (माझा मित्र तर तिकडे गेला असता पाठिवरची पिशवी पोटावर घेवून फिरत होता असे म्हणाला.)
आता पुढच्या भागात रोमची उर्वरित कहाणी सुद्धा लिहा. आणि काही प्रकाशचित्रे सुद्धा टाका.
-- (पासपोर्ट शर्टाच्या आत ठेवून झोपण्यास सुरुवात केलेला) लिखाळ.