शाळेत खांडेकरांचा 'सुखाचा शोध' नावाचा लघुनिबंध होता. त्यात सुखाच्या यादीत 'सकाळच्या चहाचा पहिला घोट' अशी सुरुवात होती. आजही पहाटे पाच -साडेपाचच्या सुमारास स्वहस्ते केलेल्या मगभर चहाचा पहिला घोट त्याच सुखाचा पुन:प्रत्यय देतो. तितक्या लवकर 'सकाळ' येत नाही. पण मग 'मनोगत' (आणि 'उपक्रम'ही - हो, त्यात काय लाजायचे!) उघडून त्यातले ताजे लिखाण वाचणे याने सकाळ सफल होते. दुर्दैवाने ते नेहमीच जमते असे नाही.
मजेदार लेख.