<<आता पहिला मुद्दा रूढ चौकटीचा. आपण देशभक्ताच्या संबंधात जो काही विचार करतो त्याला गांधी कितपत कसोटीला उतरतात याबद्दल माझ्या मनात शंका आहे. >> अरे वा! खुल्या मनाने विचार केलात तर आणखी काय हवे?
<गांधीच्या मनात इंग्रज शासनाबद्दल आदर आहे आणि हे ईश्वरी शासन आहे या बद्दल थोडीबहुत श्रद्धा आहे. असा विचार केला तर त्यांनी सविनय कायदेभंगाचा विचार आणि आचार समजून घेता येतो. >> ईश्वरी शासन म्हणजे काय हो? जर भारताला गुलाम करणारे ईश्वर तर त्यांच्याविरुद्ध ठाकलेले भारतमातेचे धगधगते सुपुत्र म्हणजे दैत्य की काय?
<( गांधी एका संस्थानाच्या दिवाणाचे चिरंजीव आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.)> त्याचा काय संबंध? हुतात्मा हरिकिशनचे वडील बडे जमीनदार होते. हुतात्मा मदनलाल धिंग्रांच्या वडीलांना शासनाचा मान होता व त्यांच्या मालकीची २६ घरे होती, त्या संपूर्ण भागाला धिंग्रा इस्टेट असे नाव होते. नेताजींचे वडील 'रायबहाद्दर' सन्मानप्राप्त होते. आझाद हिंदचे झुंजार वीर कॅप्टन प्रेम सेहगल यांचे वडील अच्छारूराम हे लाहोर न्यायानयाचे न्यायाधीश होते. तरीही त्यांच्यापैकी कुणीही अगदी बालवयात सुद्धा कधी इंग्रजांचे भोक्ते / चाहते नव्हते.
<परंतु आपला मानवी पैलूंचा अभ्यास कमी पडत आहे असे मला वाटते आणि त्यामुळे तुम्ही सत्याच्या जवळ जाण्यासाठी कमी पडत आहे असे मला वाटते. > मानवी पैलू म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे? त्याचा सत्याच्या जवळ जाण्याशी काय संबंध? भाबडी श्रद्धा व देव्हारे माजवणे म्हणजे मानवता नव्हे.
द्वारकानाथजी सत्याला सामोरे जा! आपल्या देशाबांधवांनी स्वतंत्र नागरिक म्हणून सन्मानाने जगावे म्हणुन ज्यांनी आपले आयुष्य आणि घरदार स्वातंत्र्यकुंडात समिधावत अर्पण केले तेच खरे महामानव! आणि त्यांचा आत्मयज्ञ हीच खरी मानवता!