काही सदस्यांनी व्यक्तिगत निरोपातून हॅनोईच्या मनोर्‍याविषयी नीटसे समजले नाही असे कळविले. म्हणून इथे आकृतीच्या द्वारे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. आकृतीत चकत्यांची संख्या ७ आहे. आपल्याला सगळ्या चकत्या क्रमांक २ च्या स्टँडवर आणायच्या आहेत. त्यासाठी सर्वात वरची चकती क्रमांक २ च्या स्टँडवर आणून सुरुवात करावी. एकूण चकत्यांची संख्या विषम असेल तर असे करावे. एकूण संख्या सम असेल तर पहिली चकती क्रमांक ३ च्या स्टँडवर आणून सुरुवात करावी.