काहीशी ऐकलेली, व काही एका याहू चर्चा समूहावरून आलेली माहिती अशी:
प्रतापराव गुजर हे शिवाजी महाराजांचे सेनापती होते. त्यांची बहीलोल खान मराठी राज्य नष्ट करायला आला होता, व हिंदूंवर अत्याचार करत होता. प्रतापराव गुजर त्याच्याबरोबर गनिमी काव्याचे डावपेच खेळत होते. एकदा खानाला मारायची संधी त्यांना मिळाली होती, परंतु खान नमाज पढत असल्याने त्यांनी तलवार चालवली नाही. पुढे याच खानाने हिंदू मंदिरेही जाळली. तेव्हा व्यथित होऊन शिवाजी महाराजांनी त्यांची कान-उघडणी केली व खानाला मारूनच आम्हाला तोंड दाखवावे अशी आज्ञा केली. महाराजांचे बोचरे शब्द ऐकून प्रतापराव व त्यांचे सहा शिलेदार तत्काळ घोड्यावर मांड टाकून खानाच्या सैन्यावर चालून गेले आणि वीरगतीला प्राप्त झाले.
यातील काही भाग बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या कार्यक्रमात आणि भावसरगम या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून बऱ्याच लोकांनी ऐकल्याचे ऐकीवात आहे.