माझी अक्कल काढायला गेलात आणि घसरलात!! एक्झिबिटरची वाट लागत नाही त्याला जे कराराप्रमाणे जे मिळायचे ते मिळतेच. वरचा एक्स्ट्रॉ नफा मिळत नाही.
माझ्या माहितीप्रमाणे एक्झिबिटर वितरकाला प्रिंटचे भाडे देतो. चित्रपट जर चांगला चालला तर प्रिंटचे भाडे, कर, स्टाफचा पगार, वीजबिल, प्रोजेक्टरचा खर्च, नफ्यातला हिस्सा व इतर खर्च वगळून एक्झिबिटरला फायदा होतो. जर एखाद्या चित्रपटाला कमी गर्दी झाली तर त्याचा हा खर्च निघणे अवघड होते आणि एखादा चित्रपट अजिबातच नाही चालला तर एक्झिबिटरची 'वाट'च लागते कारण त्या परिस्थितीमध्ये त्याचा खर्च होतच असतो पण उत्पन्न मात्र मिळत नाही. वितरक एक्झिबिटरला प्रिंटही देतो आणि वरून पैसेही देतो असा व्यवहार माझ्यातरी ऐकण्यात नाही. एखाद्या चित्रपटाची प्रिंट ही ठराविक कालावधीसाठी एक्झिबिटरला भाड्याने दिली जाते. म्हणजे क्ष या चित्रपटाची प्रिंट पहिल्या तीन आठवड्यांसाठी या एक्झिबिटरला या सिनेमागृहासाठी भाड्याने दिली जाते. थिएटर कुठल्या भागात आहे; कुठल्या टेरिटरीमध्ये आहे; चित्रपटात कोण कोण स्टार्स आहेत, बॅनर कोणतं आहे या सगळ्या बाबींवर प्रिंटचे भाडे ठरते. नंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादावर हा करार बदलता येतो. सिनेमागृह हा एक व्यवसाय आहे. एक्झिबिटरला सिनेमा दाखविण्याची प्रिंट मिळाली म्हणजे त्याला जो होतो तो फक्त नफाच किंवा ब्रेकईव्हन असे होत नाही. त्याला तोटाही होतोच. आणि तो चित्रपट किती चालला यावर अवलंबून असतो. तुम्ही म्हणताय तो करार हा वितरक आणि एक्झिबिटर यांच्यामधला असतो. यात पैसा एक्झिबिटरकडून वितरकाकडे जातो; वितरकाकडून एक्झिबिटरकडे नाही!

तुमच्या बाकीच्या सर्व मुद्द्यांना मला आता नव्याने उत्तर द्यायची गरज वाटत नाही कारण आता तुम्ही फक्त, "तुम्हाला वाटते तेच खरे... हे बिनडोकपणाचे आहे... हे मूर्खासारखे विधान आहे... तुम्ही माझंच खरं असा धोशा करताय... तुमचा काय अभ्यास आहे... तुम्हाला काय कळते..." वगैरे बिनबुडाची विधाने करीत आहात. धन्यवाद!

--समीर