सुंदर कथा. शेवटापर्यंत उत्सुकता वाटत राहते.
पण शेवटच्या २-३ परिच्छेदांतली काही वाक्ये खूप बाळबोध वाटली. आधी एवढे सूचक व प्रगल्भ लिहिल्यावर हे टाळता आले असते तर बरे झाले असते असे वाटते. शिवाय कथेमध्ये कोणी खऱ्या मनाने त्याला धीर, प्रोत्साहन, किंवा आधार दिल्याचे जाणवले नाही. त्यामुळे सोनूला ते मित्र जवळचे वाटणे अवघड आहे. निशांतच्या डोळ्यातही केवळ सोनूविषयी आदरभावना क्षणभर दिसली होती त्यात प्रोत्साहन किंवा आधार नसावा. अभिनवनेही त्याला आग्रह करताना तो धीर देण्यासाठी किंवा प्रोत्साहनात्मक बोलतोय असे जाणवले नाही. कदाचित अभिनवचा काही कावेबाजपणा असावा असे वाटत होते.
कथा आवडली!