तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मांडण्यापेक्षा प्रेक्षकांना काय बघायचे आहे ते दाखवा, किंवा जे तुम्हाला दाखवायचे आहे ते प्रेक्षकांना रुचेल अशा पद्धतीने दाखवा हा मंत्र जोपर्यंत अमंलात येत नाही तोपर्यंत मराठी चित्रपटांची अशीच ससेहोलपट आपल्याला हळू - हळू सगळ्या शहरांत पहायला मिळणार आहे.

फक्त या एका वाक्यावर असहमत बाकी लेख छान आहे आणि त्यावरचा अभ्यास ही.

 हिंदी चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपट यात प्रेक्षक हा चित्रपट चांगला की वाईट हे ठरवण्यासाठी सिनेमाग्रुहात जातो पण मराठी चित्रपटा बाबतीत अस होत का? बाकी प्रेक्षकांना काहीही रुचत आणि पचत अस मला त्या हिंदी चित्रपट बघितल्यावर वाटत मग आपल्याच अपेक्षा का मराठी चित्रपट चांगले हवे मगच ते चित्रपटग्रुहात बघणार? चांगले आणि वाईट हे ठरवे पर्यंत मराठी चित्रपट सिनेमाग्रुहातून निघून गेले असतात.

मिशन च्यंमप्यीयन हा चित्रपट दोनदाच लागला आणि त्याची बातमी मिळाली नव्हती घरी आल्यावर पेपराच्या कोपऱ्याला त्याची जाहीरात वाचायला मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे चिनी कम हे हा चित्रपट न पचणारा आहे हे कळून हि १ महिन्यानंतर लोक त्याची तिकिट घेत होती? मराठी चित्रपटसुष्टी वेगवेगळे विषय हाताळताना दोन दिवस जर हे चित्रपट सिनेमाग्रुह दाखवत असतील तर आपल्याला ते गर्दी करुन बघायला हवे आणि मग त्या विषयी चर्चा करायला हवी.

फक्त दोन दिवस मल्टीपेक्समध्ये दाखवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटाबाबतीत जर आपण अपेक्षा ठेवल्या तर कस चालेल. मराठी चित्रपटाकडे दुर्लक्ष करुन न पचणारे ( बिनडोक ) हिंदी चित्रपट बघतोच ना ? मग मराठी चित्रपट का बघू नये ?