जिवाचा गुंफलेला गोफ रंगानी झळाळावा
जसा या कुंतलांना मोगऱ्याचा गंध लाभावा
पहाटे कोर चंद्राची दिसावी दूर पूर्वेला
कलेने एकएका रंग स्वप्नाला तसा यावा

लिहायला शब्दच नाहीत. सुंदर.