कथेविषयी आणि शीर्षकाविषयी सहमत.
मला तर कथा एक दमात वाचायला अधिक आवडली. लठ्ठ माणसांचा न्यूनगंड, भरपेट जेवण झालेले असतानाही परत खाण्याचा मोह न आवरणे, त्यातून अपराधीपणाची भावना येऊन कधी कधी 'शुगर फ्री' वगैरे वापरणे वगैरे निरीक्षणे सूक्ष्म आणि अचूक.
काहीकाही गोष्टींचे प्रयोजन कळाले नाही - कुत्र्याचे दारु पिणे वगैरे- पण एकंदरीत कथा 'जमलेली' आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!