एखाद्या धर्माचे असणे म्हणजे एखाद्या संस्थेचे सभासद असण्यासारखेच आहे आणि प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या धर्माचे असावे ही अपेक्षा चुकीची आहे. माझ्या मते, बरेचसे लोक हे आपण बऱ्याच गोष्टी का करतो ह्याचा विचार करत नाहीत, तसेच ते आपण अमुक एक धर्मात का आहोत ह्याचाही विचार करीत नाहीत. जेव्हा लोक असा विचार करू लागतील तेव्हाच धर्म ह्या शब्दाची निरुपयोगिता लोकमन्य होईल.