लेखतील मुख्य विचार चांगला आहे. त्यावर प्रत्येक माणसाने जरूर विचार करावा.
प्रत्येक मनुष्य प्रत्येक बाबतीत काय बरोबर काय चूक हा विचार करू शकत नाही. त्याने तसे केल्यास त्यात मतभेद होतात व त्यातून संघर्ष निर्माण होतात. ते टाळण्यासाठी शहाण्या लोकांनी मार्गदर्शन करावे आणि सर्वसामान्य लोकांनी त्याप्रमाणे आचरण करावे या संकल्पनेमधून वेळोवेळी वेगवेगळे धर्म आधी निर्माण झाले.
आपला आणि परका हा भेद माणसे नेहमी करतातच. त्या मनोवृत्तीमुळे आपल्या धर्माचा अभिमान व दुसऱ्या धर्माचा तिटकारा वगैरे भावना निर्माण होतात. ही गोष्ट विवेकाने टाळता येईल, पण त्याचा अभाव असला तर कांहीही करता येणार नाही. भेदभाव करण्यासाठी धर्म ही कांही एकच गोष्ट नाही. जात, पोटजात, भाषा, आर्थिक परिस्थिती, वय, लिंग, नाते, मालकमजूर किंवा दुकानदार-गिऱ्हाईक अशा प्रकारचे अनेक प्रकारचे आपपरभाव करून त्यावरून भांडणे होतच राहतात आणि राहतील.
सर्व मनुष्यजातीने कलह न करता सामंजस्याने रहायचे असल्यास आपपरभाव सोडणे हाच कठिण मार्ग धरावा लागेल.